मराठी गीत (आता उठवू सारे रान)
आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान,
शेतकर्यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण
किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील,
एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल हे रान
कोण अम्हां अडवील, कोण अम्हां रडवील
अडवणूक करणात्यांची उडवू दाणादाण
शेतकर्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे
तिरंगि झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान
पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन् कामकरी मांडणार हो ठाण
---साने गुरुजी
Video link of this song
Very nice
ReplyDelete